???? ???? ??????????????? ?????? ?????? : ?????

 
C-DAC Logo
 
Navprabha
February 16, 2018

सरकारचे स्टार्ट अप धोरण आयटी गुंतवणुकदारांना आकर्षित करणारे असणार आहे. राज्यात नवीन उद्योग स्थापन होऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्‍वास आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी काल व्यक्त केला.

सी – डॅकच्या स्वदेशी परम शावक व्हीआरचे अनावरण आणि राष्ट्रीय परम शावक युझर्स संमेलन कार्यक्रमात मंत्री खंवटे बोलत होते. यावेळी सी-डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी, एनआयटी गोवाचे संचालक प्रा. गोपाल मुरेरय्या यांची उपस्थिती होती.

सी-डॅकने नव्याने विकसित केलेले परम शावक व्हीआर तंत्रज्ञान राज्यातील महाविद्यालयात उपलब्ध करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यात येणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर बदलत्या काळानुसार आभासी वास्तव अभ्यासाचे शिक्षण उपलब्ध करण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर माहिती तंत्रज्ञानात सातत्याने नव नवीन बदल होत आहेत. राज्य सरकारने स्टॉट उद्योगाला चालना देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. स्टार्ट अप धोरण लवकर जाहीर केले जाणार आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

आघाडी सरकारच्या मागील नऊ महिन्याच्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राज्यातील वातावरणाला पुरक उद्योग स्थापन करण्यासाठी नियोजन केले जात आहे. माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणार्‍याना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. स्टार्ट अप, माहिती तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी योग्य वाताव��ण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले. एनआयटी- गोवाने सी-ड२क परम शावक संगणकाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. शिक्षणाबरोबर शेतीच्या विकासाला चालना देण्यासाठी सी-डॅक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे, असे प्रा. मुरगय्या यांनी सांगितले. सी-डॅकने विविध क्षेत्रातील लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्हर्चुअल रीऍलिटी बेस्ड सर्व्हीसस तयार केल्या आहेत. यामध्ये पर्यावरणाचा आभास रूपाने शोध घेण्याची क्षमता वापरणार्‍याला मिळते. शैक्षणिक संशोधनापासून ते अभियांत्रिकी, डिझाईन, आरोग्य सेवा, डिझाईन, सैनिक क्षेत्र, फॅशन, व्यवसाय, क्रीडा, करमणूक, दळणवळण, प्रसारमाध्यमे, चित्रपट, प्राचीन वारसा, बॅकींग आणि प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो, असे डॉ. दरबारी यांनी सांगितले.

सी-डॅकचे परम शावक व्हीआर हे एक अत्यंत शक्तीशाली व्हर्चुअल रिऍलिटी सोल्युशन आहे. हे देशांतर्गत विकसित केलेले असून त्याला अत्याधुनिक व्हीआर तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. विद्यार्थी आणि शिक्षण तज्ज्ञ यांना पारंपारिकतेच्या पलिकडे जाऊन विविध ठिकाणी व्हीआर एनेबल्ड सेवांचा शोध ध्यायला मदत होते. कल्पना अंटरऍवटीव्ह ३ डी मॉडेलच्या सहाय्याने भागधारकंासमोर मांडता येतात, असेही डॉ. दरबारी यांनी सांगितले.

Top